गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

दिखावू पणाचे कार्यक्रम राबविले जाणार नाही – महापौर मुक्ता टिळक

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पुढील काळात कोणत्याही प्रकारचे दिखावू पणाचे कार्यक्रम राबविले जाणार नसून सर्व पक्षातील नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करणार आहे. अशी भूमिका नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषेदत मांडली.

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून आल्यानंतर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणेकर जनतेने भाजपला भरभरून दिले असून ते लक्षात घेता. येत्या काळात शहरातील विकास कामांना अधिक प्रमाणात गती मिळण्यास मदत होणार आहे.तर महापौरपदाच्या काळामध्ये राज्य शासनाने शहराच्या डीपी मंजुरी दिली आहे. त्याची प्रभावी पणे अमलबजावणी करण्यावर भर राहणार असून त्या अंतर्गत अधिकधिक निधी आणला जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्यात विशेष लक्ष देऊन तो लवकर पूर्ण करणार आहे.तसेच शहरातील महिला सुरक्षित राहण्यासाठी विशेष उपाय योजना राबविणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नगरसेवकांना महिन्यातून किमान एक दिवस कार्यक्रम घेण्याचे आवाहन करणार आहे.त्यातून पर्यावरणाचा अधिक समतोल राखण्यास मदत होईल.त्याचबरोबर पुणे शहराला निसर्गाने दोन नदयाची देणगी दिली आहे.त्यादृष्टीने केंद्र सरकार आणि राज्यसरकार मार्फत या नदी सुधार करिता मंजूर झालेल्या निधीमधून काम करण्यात येणार आहे.शहरात झोपडपट्टी क्षेत्र अधिक प्रमाणात असून त्या पार्श्वभूमीवर स्वस्ता घरे आणि आरोग्य सेवा देण्यावर भर राहणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. 

Latest news
Related news