विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांचा लाक्षणिक संप

एमपीसी न्यूज – घरभाडे भत्ता पूर्वीप्रमाणे मिळावा, रविवारी व सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवू नये , आऊट सोर्सिंग बंद करा, निवृत्ती वेतन योजना पूर्वीप्रमाणे चालू करा, अशा विविध मागण्यांसाठी आज (गुरुवारी) चिंचवड पूर्व डाकघर येथे टपाल कर्मचा-यांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.


या संपामध्ये पुणे शहारातील नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज,नॅशनल युनियन ऑफ ग्रमिण डाक सेवक, नॅशनल युनियन ऑफ रेल्वे मेल सर्वीस, नॅशनल  युनियन ऑफ मेल मोटर सर्वीस, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संपासाठी कामगारनेते एल. डी. कुंभार, डी. आर. देवकर, अमृता सप्रे, आर. पी. कर्पे, डी. बी. मराठे, डी. के. गोडसे, अक्षय मिंडे, के. एस. पारखी, रामदास वाकडकर आदी संघटनांचे प्रतिनिधी व टपाल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी कर्मचा-यांनी  घरभाडे भत्ता पूर्वीप्रमाणे म्हणजे 30 टक्के, 20 टक्के, 10 टक्के असा मिळावा, आऊटसोर्सिंग बंद करावे, अनुकंपा तत्वावरील तसेच इतर रिक्त जागा त्वरित भराव्यात, रविवारी व सुट्टीच्या दिवशी कामावर कर्मच्या-यांना बोलवू नये, नवीन निवृत्ती योजना बंद करुन जुनी योजना सुरु करावी,  बढती करिता ‘व्हेरी गुड’ हा शेरा रद्द करावा, कर्मचा-यांना किट ऑटमचा वेळेवर पुरवठा करावा अशा विविध मागण्या या वेळी मांडण्यात आल्या.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.