आईच्या पाठिंब्यामुळेच नगरसेवक – प्रमोद कुटे

एमपीसी न्यूज – नगरसेविका असलेली आई चारुशीला कुटे हिचे निवडणुकीत मार्गदर्शन मिळाले. तिचे अनुभव माझ्या कामी आले. आईच्या पाठिंब्यामुळेच मी निवडून आलो, अशी भावना नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद कुटे यांनी ”एमपीसी न्यूज”शी बोलताना व्यक्त केली. 

प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी गावठाणातून प्रमोद कुटे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

प्रमोद कुटे यांच्या मातोश्री चारुशीला कुटे गेल्यावेळी आकुर्डी प्रभागाच्या नगरसेविका होत्या. त्यांनी गेल्या पाच वर्षात प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्या कामांच्या जोरावरच आपण निवडून आल्याचे कुटे यांनी सांगितले.

करदात्या नागरिकांना सर्व सुख-सुविधा मिळाल्या पाहिजेत. आकुर्डी येथे 100 बेडचे रुग्णालय, दारुमुक्त प्रभाग करणार आहे. आकुर्डी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तिथे एक शाळा देखील आहे. याठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ”स्काय वॉक” सारखा पूल उभारणार असल्याचे कुटे यांनी सांगितले. 

प्रभागातील आरक्षणे ताब्यात घेऊन विकसीत करणार आहे. रामनगर येथील नागरिकांना झोपडपट्टी निर्मुलन पुनवर्सन प्रकल्पाअंतर्गत घरे देणार आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. निगडी येथील अप्पूघर उद्यान पुनर्जिवित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि घरपट्टी भरणा-या शहरातील सर्व नागरिकांना महापालिकेने वैद्यकीय विमा काढून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रमोद कुटे यांना क्रिकेट, फुटबॉल खेळण्याची आणि वर्तमानपत्र वाचणे, विविध विषयांवरील चर्चासत्रे ऐकण्याची आवड आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, आझम पानसरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांचे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे कुटे यांनी आवर्जून सांगितले.  
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.