पुणे महापालिकेच्या सभागृहनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या सभागृहनेतेपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी भिमाले यांना निवडीचे पत्र दिले आहे. 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक उपस्थित होते. 

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला 98 जागा मिळाल्या आहेत. भिमाले यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी त्यांना महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या सभागृहनेतेपदी निवड झाल्याचे पत्र दिले आहे.  

भिमाले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. डीएडी कॉलनी या प्रभागातून ते सन 2002 मध्ये प्रथम नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून गेले. सन 2007 मध्ये त्यांची पत्नी वंदना या भाजपतर्फे निवडून आल्या. श्रीनाथ भिमाले यांनी सन 2008 मध्ये भाजपचे शहर चिटणीस म्हणून काम पाहिले आहे. 2012  मध्ये प्रभाग क्रमांक 64 मधून ते निवडून आले होते. यंदा ते सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर या प्रभाग क्रमांक 28  मधून विजयी झाले आहेत.

स्थायी समिती सदस्य, शहर भाजपचे सरचिटणीस, प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समिती सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.