सैराट फेम आकाशचं अफेअर कोणासोबत आणि कुठे सुरु आहे?

महेश मांजरेकरांची मस्तीची पाठशाळा


एमपीसी न्यूज – मराठी चित्रपटसृष्टीत महेश मांजरेकरांचा दरारा सर्वश्रुत  आहे. चित्रपटसृष्टीतील कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपून राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची इत्थंभूत माहिती मांजरेकरांकडे असते. सैराट फेम आकाश ठोसरच्या सुरु असलेल्या अफेअरची कानोकान खबर लागताच मांजरेकरांनी आकाशची चांगलीच शाळा घेतली.

आकाशच्या वाढत्या फोनकॅाल्सची खबरबात घेत ‘सध्या तो काय करतो’ याचं गुपित मांजरेकरांनी उलगडलं आहे. आकाशचं अफेअर कोणासोबत आणि कुठे सुरु आहे? हे जाणून घेण्यासाठी झी टॅाकीजवर रविवार (दि.19) प्रसारित होणा-या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ 2017 या पुरस्कार सोहळ्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल.

दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर कलाकारांची चांगलीच शाळा घेतात, किंबहुना हा पुरस्कार सोहळा महेश मांजरेकरांच्या स्पूफमुळेचं अधिक रंगतदार होतो. यंदाही हा सोहळा अनेक आकर्षक कलाविष्कारांनी चांगलाच रंगला. या सोहळ्याचा आस्वाद रविवार सायंकाळी सात वाजता झी टॅाकीजवर घेता येईल.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.