द ग्लॅमर मॉडेल्स संस्थेतर्फे विविध कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – द ग्लॅमर मॉडेल्स संस्थे तर्फे जाहिरात आणि कला क्षेत्रात करिअर करू पाहणा-या युवा वर्गासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, सेल्फ मेकअप टेक्निक, उभे रहाण्याच्या, बसायच्या योग्य पद्धती, शिष्ठाचार इत्यादी तसेच सूत्रसंचलन किंवा अभिनय क्षेत्रात असलेलं आवाजाचं महत्व आणि त्यासाठी आवाज स्वरनियमन, संवादफेक, उच्चार अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. कार्यशाळेला युवतीं इतकाच युवकांचा हि चांगला प्रतिसाद लाभला.

सौन्दर्यतज्ज्ञ रीटा वर्मा यांनी स्वत: रंगभूषा कशी करायची या बाबत मार्गदर्शन केले. दिवसा आणि रात्रीच्या वेळी करायची रंगभूषा, पार्टी मेकअप याचे तंत्र शिकवले व याच बरोबर केलेली रंगभूषा जास्तीत जास्त वेळे पर्यंत कशी टिकवता येईल तसेच ती त्वचे वरून कशी काढायची याची माहिती दिली. त्वचेची निगा कशी राखायची या बरोबरच त्वचेचे प्रकार व त्यावरून कोणत्या प्रकारची रंगभूषा योग्य असावी याचे प्रात्यक्षिक हि यावेळी दाखवण्यात आले.

मुनिरा कामरी यांनी स्वर नियमना विषयी मार्गदर्शन केले. सूत्र संचालक, वाहिनीवर न्यूज रीडर, अथवा जाहिरात /अभिनय क्षेत्रात आवाजाला अतिशय महत्व असते आणि त्यासाठीच स्वरयंत्राची काळजी कशी घ्यावी, उच्चार कसे असावेत तसेच बोलताना अथवा उभे राहिल्यावर हातवा-यांवर नियंत्रण कसे ठेवावे, शिष्ठाचारा मध्ये टेबल मॅनर्स तसेच सार्वजनिक ठिकाणी कसे वावरावे या बाबत मार्गदर्शन केले.

मॉडेल आणि मॉडेलिंग प्रशिक्षक झोया पटेल यांनी ग्लॅमर विश्वात प्रवेश करण्यापूर्वीची तयारी कशी असावी या बाबत मार्गदर्शन करताना पोर्टफोलिओ म्हणजे काय व तो कसा असावा याची माहिती दिली. विविध पोशाखां मधील छायाचित्रं (पोर्टफोलिओ) त्या वेळचे चेह-यावरील हावभाव तसेच विविध छटा असलेली छायाचित्र कशी काढून घ्यावीत याची संपूर्ण माहिती दिली. ग्लॅमर क्षेत्रात व्यक्तिमत्वाला विशेष महत्व असते याची जाणीव करून देतानाच त्यांनी उत्तम शरीर स्वास्थ्यासाठी आहार विहार पण योग्य असावा असा सल्ला दिला. कार्यशाळेचे आयोजन रोहित श्याम ननावरे आणि चैताली रवींद्र नेहेते यांनी केले.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.