महिलांचा प्रवास अधिक सुखकर होणे गरजेचे – मुक्ता टिळक

पीएमपीएमएलने प्रवास करत महापौरांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या


एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या नवनिर्वाचीत महापौर मुक्ता टिळक यांनी आज कात्रज ते स्वारगेट असा पीएमपीएमएलने प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या प्रयत्न केला.

मुक्ता टिळक यांची कालच पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी कामाला सुरवात केली. पुण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर असताना त्या पार्श्वभुमीवर पुणेकर प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी आज सकाळी 8 वाजता कात्रज ते स्वारगेट असा पीएमपीएमएलने प्रवास केला.

याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, पुणे शहरात राबवील्या गेलेल्या ‘बस डे’ नंतर आज पीएमपीएमएलने प्रवास केला. पीएमपीएमएलने प्रवास करणा-या महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणे गरजेचे आहे. आजही अनेक महिलांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. त्यांना बसायला जागा नसते, धक्के खात खात त्या प्रवास करत असतात. त्यासाठी कामाच्या वेळेत महिलांसाठीच्या जादा गाड्या सोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. राज्यसरकारच्या ‘तेजस्वीनी’ बसेस मिळविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



आगामी काळात पुणे शहरतील जटील होत चाललेली वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.