कमळाच्या चिन्हावर निवडून आलो तरी रिपाइंचा वेगळा अजेंडा -उपमहापौर कांबळे

एमपीसी न्यूज – भाजपच्या चिन्हावर आम्ही निवडून आलो असलो तरी महापालिकेत काम करताना रिपब्लिकन पक्ष म्हणून स्वतंत्र अजेंडा असणार आहे, अशी भूमिका पुण्याचे नवनिर्वाचित उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

रिपाइंचा स्वतंत्र गट करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी फेटाळल्यानंतर आता यापुढे रिपाइंच्या पाचही नगरसेवकांना भाजपचे नगरसेवक म्हणून काम करावे लागणार, हे स्पष्ट झाले होते. या प्रश्नावर कांबळे यानी वरील भूमिका जाहीर केली. 

राज्याच्या विविध भागातून पुणे शहरात शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्यासाठी येत्या काळात स्वतंत्र वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती कांबळे यांनी दिली. 
उपमहापौर कांबळे म्हणाले की, तळागळातील विद्यार्थीवर्गाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये. यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.