पिंपरीच्या प्रवीण निकमच्या कामाचा राज्य सरकारच्या राज्य युवा पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज –  महिलांची मासीक पाळी, त्यांचे आरोग्य याबाबत कोणतेही भिडभाड न बाळगता केवळ सामाजिक भान जपत काम करणा-या पिंपरीतील एच.ए.कॉलनीत राहणा-या प्रविण निकम याच्या कामाची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. त्याच्या कामासाठी राज्य शासनाचा 2015-16 चा ‘राज्य युवा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे.

राज्य शासनातर्फे 2014-15 व 2015-16 या दोन्ही वर्षातील  राज्य युवा पुरस्काराचे वितरण काल (दि.15) राज्याचे शिक्षण व युवा कल्याणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम  मुंबई येथे पार पडला. ज्यामध्ये 40 युवकांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्य युवा परुस्कार बहाल करण्यात आला.

यासाठी पुण्यामधून नेहा भाटे व प्रविण निकम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रविण निकम  हा अवघा 24 वर्षांचा असून त्याने ‘रोशनी’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 2011 सालापासून स्त्रीयांसाठी काम चालू केले आहे. यामध्ये स्त्रीयांची मासीकपाळी, त्यांचे आरोग्य, स्वच्छता, आदी बाबत जनजागृती करणे, कामगार महिला यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे भरवणे, त्यांच्या समस्या सोडवणे आदी कामे प्रविण व त्याचे सहकारी करत असतात. तसेच त्यांनी आता अंध विद्यार्थी, स्वच्छता आदीसाठीही रोशनीच्या माध्यमातून कामे केली जात आहेत.

प्रविणच्या या कामाचे राणी एलिझाबेथ यांनी स्वतः भेटून  ‘चॅम्पियन्स ऑफ युथ’ असे विशेषण देऊन कौतुक केले.    
"dipex"

""

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.