शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

देहूरोड येथे रेल्वेतून पडल्याने तरुणी जखमी

एमपीसी न्यूज – प्लॅटफार्मचा धक्का पायाला लागल्याने धावत्या रेल्वेतून खाली पडून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानक येथे घडली. 

जखमी झालेल्या मुलीचे नाव समजू शकले नसून तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. आरती नाव असल्याचे ती तरुणी सांगत आहे. 

मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या इंदौर या रेल्वतून ही तरुणी प्रवास करत होती. दरवाजात पाय खाली सोडून ती बसली होती. रेल्वे देहुरोड रेल्वेस्थानकाजवळ आली असता तरुणीच्या पायाला प्लॅटफार्मचा धक्का लागल्याने ती खाली पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 

त्याचवेळी पुण्याकडून लोणावळ्याकडे जाणारी लोकल रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत तिला देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे.
"dipex"
spot_img
Latest news
Related news