मावळात शिवभक्तांना ताकाचे आणि नागरिकांना माठाचे वाटप

एमपीसी न्यूज – बालविकास मित्र मंडळ आणि  स्मित कला रंजन या संस्थेच्या वतीने शिवज्योत घेऊन येणा-या एक हजार शिवभक्तांना थंडगार ताक वाटप करण्यात आले. त्याचबरोबर 50 नागरिकांना पाण्याच्या माठांचे देखील वाटप करण्यात आले.


यावेळी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर यांचा प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी  उपसभापती शांताराम कदम, भाजपा मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ कायदेतज्ञ  तुकाराम काटे, रत्नाकर बवरे, पत्रकार गणेश विनोदे, सुदेश गिरमे, नारायण ढोरे, श्री पोटोबा संस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, नंदकिशोर गाडे, व्याख्याते विवेक गुरव, आबासाहेब शेळके,  सुरेश गायकवाड,  किरण म्हाळसकर, अजय भवार आदी उपस्थित होते. 

आपण रहात असलेल्या परिसरात लहान मुले, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक  जास्त प्रमाणात वावरत असतील. या कडाक्याच्या उन्हात जर तुम्हाला त्यांना पाणी द्यावेसे वाटले, तर आपण या एका मिनी पाणपोईचे पालकत्व स्वीकारण्याचे, आवाहन आयोजकांनी केले आहे. 

एक नवा कोरा थंड पाण्याचा, अत्यंत सुबक व नळ असलेला माठ, त्यावरील झाकण आणि स्टीलचा ग्लास असे या संचाचे स्वरूप आहे. 50 नागरिकांनी या मिनी पाणपोई सुरु केल्या आहेत. या माठासाठी नागरिकांनी कोणतेही शुल्क द्यावयाचे नाही. उन्हाळ्यानंतर हा माठ आपण स्वतःच्या घरी वापरावा. प्रत्येक उन्हाळ्यात पाणी भरून बाहेर ठेवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  

मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण चव्हाण, अतुल राऊत, भूषण मुथा यांनी यांच्या संकल्पनेतून शिवज्योत घेऊन येणा-या शिवभक्तांना थंडगार ताक आणि माठाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी बोलताना सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी, या नाविन्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. तसेच असे उपक्रम सर्वत्र राबविले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  
 

भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात शिवकालीन संस्कृतीच्या जतनाबद्दलची माहिती देत या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपसभापती शांताराम कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. 

माजी उपसभापती प्रवीण उर्फ राजू चव्हाण यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पबद्दलची माहिती दिली. भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन तर अतुल राऊत यांनी आभार मानले. 

रिजवान मोमीन, प्रसाद बिराजदार ,मनोज शिर्के, प्रवीण पाटोळे, सिकंदर शेख, शेहबाज मोमिन, श्रीकांत महामुनी, रोहित गवस, दीपक कोकाटे, संदेश भांबळ, प्रथमेश घाग, केदार बवरे यांनी संयोजनात पुढाकार घेतला. 

राजूशेठ कुलकर्णी – महेश प्रेस, मनोज जाधव, दस्तगीर मोमीन, अमोल मुथा, झुंबरशेठ कर्णावट, श्रीखंडे काका, नितीन कुडे, महामुनी काका, सुधाकर  ढोरे, भाऊसाहेब ढोरे, प्रमोद म्हाळसकर, महेंद्र चव्हाण, गणेश ढोरे, विशाल चव्हाण, विश्वासराव भिडे, राजेंद्र राऊत, अमर चव्हाण, जावेद  तांबोळी, अशोक चोरडिया, जामा मस्जिद वडगांव, विशाल वहिले, अनिल निकम, सुरेश जांभुळकर, राजू बाफना, महेंद्र सुर्वे, बाळासाहेब बोरावके, दिनेश पगडे, अंकित बाफना, भैरवनाथ दत्तनगरी परिवार, सचिन मसेटे, डॉ. कुंदन बाफना, पांडागळे काका, गणेश विनोदे, सुदेश गिरमे, मनोज  गुजराणी, दिनेश  ढोरे, नंदकुमार म्हाळसकर आणि शशिकांत कुंकुलोळ यांनी एका माठाचे पालकत्व स्वीकारले आहे. 
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.