दुचाकी वाहनांसाठी डेंगळे पुल खुला

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील शिवाजीनगर येथील मुळा नदीवरील डेंगळे पुलाची दुरुस्ती झाली असून हा पुल उद्यापासून (17 मार्च) दुचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाहतुक पोलिसांनी दिली. या पुलाची इतर कामे पुर्ण होईपर्यंत या पुलावरून चारचाकी व अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे.
हा पुल साधारण 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. पुलाचे फाउंडेशन पिलर, बीमच्या मजबुतीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले होते. 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून हा पुल दुरूस्तीच्या कामामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरवातीला 28 फेब्रुवारीपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.