पुणे ते दौंड रेल्वेस्थानकादरम्यान उद्या ब्लॉक

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या वतीने पुणेते दौंड दरम्यानच्या मार्गावर दुरूस्तीच्या कामामुळे उद्या (शुक्रवार) ब्लॉक ठेवण्यात आला आहे. हडपसर रेल्वे स्थानका जवळ असलेल्या  पुलाचे काम करण्यासाठी सकाळी 9.50 ते सायंकाळी 4 या दरम्यान हा ब्लॉक ठेवण्यात आला आहे.

या ब्लॉकमुळे 51452 बारामती-पुणे पॅसेंजर दौंड स्थानकापर्यंतच धावणार आहे. दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी सुटणारी 51421 पुणे-निझामाबाद पॅसेंजर पुणे एवजी दौंड येथून सुटणार आहे. निझामुद्दीन-वास्को दा गामा, जम्मूतावी-पुणे, नागरकॉइल-सीएसटीएम एक्स्प्रेस, बंगळुरु-सीएसटीएम या गाड्या देखील ब्लॉकमुळे प्रभावीत होणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेत सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.