महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; नाशिकचा भूषण अहिरे राज्यातून पहिला

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये  नाशिकचा भूषण अहिरे याने बाजी मारत महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवला असून त्याला उप-जिल्हाधिकारी पद मिळाले आहे.महिलांमध्ये पूनम पाटील ही विद्यार्थिनी राज्यात पहिली आली आहे. सह-पोलीस आयुक्त या पदासाठी तिची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या गेलेल्या परीक्षेत 130 उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यापैकी पाच उमेदवारांची शिफारस उप-जिल्हाधिकारी या पदासाठी तर 6 उमेदवारांची निवड सहाय्यक आयुक्त सेवा कर विभागासाठी करण्यात आली आहे. 30 उमेदवारांची निवड पोलीस अधीक्षक किंवा सह पोलीस आयुक्त या पदासाठी करण्यात आली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत यश मिळविणा-या  श्रीकांत गायकवाड, संजय कुमार ढवळे, भसके संदीप आणि नीलम बाफना या उमेदवारांची निवड उप-जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.