एमपीसी न्यूज – वडिलांनीच स्थापन केलेल्या अशोक नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका असलेल्या सुलक्षणा धर- शिलवंत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात प्रवेश केला असून त्या आता शहर व्यवस्थापनाची धुरा आपल्या खांद्यावर घेणार आहेत.
सासर काश्मीरचे. तर माहेर पिंपरी-चिंचवडचे. त्यांचे पती राजीव धर फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहेत. तर कौशिक व अर्जुन ही दोन मुले. काश्मीरची सून आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून येणार असल्याने आनंद द्विगुणित झाला. सुलक्षणा धर-शिलवंत या प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या. त्यांचा 12081 मतांनी त्यांचा विजय झाला. हा विजय शब्दांत व्यक्त होत नसल्याचे त्या सांगतात. अशा भावना त्यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या.
सुलक्षणा धर (शिलवंत) या अशोक नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संत तुकारामनगर मध्ये स्वतःचे व्हिवा बुटिक आहे. बँकेच्या कामाबरोबर त्या त्यांचे वैयक्तिक आयुष्य ही आनंदात जगतात. त्यांनी बँकेच्या माध्यमांतून जनसंपर्क वाढण्यास सुरुवात झाली. वडील अशोक शिलवंत हे पिंपरीतील अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वडिलांना समाजकार्याची आवड असल्यामुळे ती माझ्याही अंगी रुजली. घरात कोणतेही राजकीय वातावरण नाही. खरे तर राजकारण हा माझा नावडता विषय. पण जनसंपर्कामुळे मला हे यश मिळाले. त्यांना माणसे जोडण्याची खूप आवड आहे. महिलांना सक्षम करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. मूलभूत सुविधा देण्यावर भर, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मराठी शाळा कशा टिकविता येतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला बचतगटाचा वापर हा फक्त राजकारणासाठी होत आला आहे. त्यामुळे सक्षमीकरणासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभे करणार आहे. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून वावरायचे आहे. निवडून येण्याची हवा डोक्यात न जाता ती हवा जमिनीवरच राहणार आहे. नागरिकांना पालिकेच्या विविध योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ मिळवून देण्याचाही प्रयत्न त्यांचा असणार आहे.
