सांगवीत तरुणावर कोयत्याने वार; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – कारची काच फोडत असताना जाब विचारल्याचा राग आल्याने चिडलेल्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि.16) पहाटे काशीदनगर, पिंपळेगुरव येथे घडली.

याप्रकरणी युवराज सुरेश काशीद (रा. काशीदनगर, पिंपळेगुरव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रमोद भारती (वय 35, रा. काशीदनगर, पिंपळेगुरव) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गुरुवारी पहाटे युवराज हा विनाकारण शिवीगाळ करत काशीदनगर येथे पार्क केलेल्या कारची काच फोडत होता. प्रमोद याने त्याच्याकडे काच फोडण्याचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या युवराज याने प्रमोद याला शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर प्रमोद याच्या मोटारीसह, परिसरातील चार वाहनांची तोडफोड आणि विशाल काशीद यांच्या कार्यालयाचे नुकसान केल्याचे, पोलिसांनी सांगितले.

सांगवी ठाण्याचे फौजदार एस.जी.पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.