शनिवार, डिसेंबर 3, 2022

हिंजवडीत इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीच्या सातव्या मजल्यावर विटा वाहून नेत असताना तोल जाऊन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जानेवारी 2017 रोजी बावधन -खुर्द, मुळशी येथे घडली.

रोहितकुमार झाडूराम साहू (वय 27, रा. बावधन, मूळ बेमेतरा, छत्तीसगड), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांतकुमार होनीया मेघावत (वय 28, रा. सुसगाव, मुळशी) या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

बावधन येथे आदित्य डेव्हलपर्स बांधकाम साईट सुरू आहे. प्रशांतकुमार मेघावत यांनी या कामाचा ठेका घेतला आहे. रोहितकुमार हा त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करत होता. 21 जानेवारी 2017 रोजी रोहितकुमार हा इमारतीच्या सातव्या मजल्यावर विटा घेऊन जात होता. त्यावेळी तोल गेल्याने तो खाली पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

ठेकेदार प्रशांतकुमार मेघावत यांनी कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.ए.डोळस तपास करत आहेत.

Latest news
Related news