शिक्षणासाठी अपंग मयुरी दरेकरला मंडई मंडळाचा मदतीचा हात

अखिल मंडई मंडळाचा उपक्रम, उच्चशिक्षणासाठी आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – जन्मत:च असलेले अपंगत्व, त्यात घरची बेताची परिस्थिती असताना देखील लहान भावंडाचा आधार बनत असताना तिला शिक्षणाच्या ओढीने स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळे बेताची आर्थिक परिस्थिती असून देखील तिने आपले शिक्षण सुरु ठेवले. कोंढव्यातील मयुरी दरेकर या अपंग मुलीच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी अखिल मंडई मंडळाने मदतीचा हात पुढे केला आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.

अखिल मंडई मंडळातर्फे गणपती मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात मयुरीला उच्चशिक्षणासाठी 30 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ऋत्वीज भावकर,  संजय मते, विश्वास भोर, राजेश करळे, राजेंद्र बलकवडे, हरीश मोरे, नारायण चांदणे, तुषार दवे यांसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अण्णा थोरात म्हणाले, अखिल मंडई मंडळ गरजूंच्या मदतीकरता नेहमीच पुढाकार घेत असते. गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या कामाचा आदर्श घालून दिल्यास इतर गणेशोत्सव मंडळे देखील तसे काम करतील. यामुळे समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.