घरगुती कारणातून अभियंत्याचा पत्नीसह विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – घरगुती कारणातून सॉफ्टवेअर अभियंत्याने पत्नीसह विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.16) रात्री साडेआठच्या सुमारास दिघीत घडली.

राजू रंजन तिवारी (वय 35) सिंधू राजू तिवारी (वय 30, रा. पोलाईट, पनोरमा सोसायटी, दिघी), असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या उच्चशिक्षित जोडप्याचे नाव आहे.

राजू तिवारी हे  सॉफ्टवेअर अभियंता आहेत. तर, सिंधू याही उच्चशिक्षित असून त्या घरीच असतात. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नेहमीच भांडणे होत असतात. गुरुवारी त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून भांडणे झाली. त्यानंतर दोघांनीही फरशी पुसण्याचे फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.      

  

हा सर्व प्रकार लक्षात येताच शेजारच्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले.

दिघी पोलिसांनी याची नोंद घेतली असल्याचे, पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.