गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ उद्या पुण्यातील दवाखाने व रुग्णालये बंद

एमपीसी न्यूज – धुळे येथील सरकारी रुग्णालयातील डॉ. रोहन मामूनकर हे 12 मार्चला रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर झाले आहेत. याच्या निषेधार्थ आय.एम.ए. पुणे शाखेने उद्या (18 मार्च) निषेध मुक मोर्चाचे आयोजन केले आहे.

उद्या सकाळी 11 वाजता शनिवारवाडा ते जिल्हा अधिकारी कार्यालया दरम्यान या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी पुण्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक दवाखाने व रुग्णालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या संपा दरम्यान डायग्नोस्टिक आणि ओपीडी बंद राहणार आहेत.

Latest news
Related news