चाकणमधील निल ऑटो कंपनीत वेतन वाढ करार

एमपीसी न्यूज – चाकण येथील निल ऑटो प्रा. लि. या कंपनीमध्ये नुकताच 11हजार 500 रुपयांच्या वेतन वाढीचा करार नुकताच संपन्न झाला.

यावेळी कंपनी व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष नंदकुमार फणसे, व्यवस्थापक एस.के. शुक्ला, मनुष्यबळ अधिकारी अनिल लाला, विभाग अधिकारी उमाकांत शेटकर, उत्पादन व्यवस्थापक दिलीपकुमार खोल्लम, आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस यशवंत सुपेकर, युनिट प्रतिनिधी नवनाथ नाईकनवरे, अमोल पाटील, राजेश पातोंड, दीपक खरात, संतोष पवार आदी उपस्थित होते.

हा वेतनवाढीचा करार मार्च 2017 ते मार्च 2020 या कालावधीसाठी करण्यात आला. मार्च 2015 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत फरक प्रत्येकी 74,000/- रुपये अदा करण्यात आले. या वेतन वाढीनुसार एकूण 250 कामगारांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये मासिक वेतन वाढ रुपये 4200, डी.ए. रुपये 1200, घरभाडे भत्ता 5%, वाहतूक भत्ता रुपये 1500, वाहन भत्ता रुपये 660, वैद्यकीय भत्ता रुपये 940 अधिक इतर भत्ते अशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रुपये 11 हजार 500 वेतन वाढ मिळणार आहे.

इएसआय मर्यादेतून बाहेर गेल्यास वैद्यकीय विमा आणि वैदयकीय विमामध्ये आई-वडिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच कामगारांसाठी सहकार संस्था स्थापन करून दहा लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. यातून कामगारांना सणासुदीसाठी बीन व्याजी दहा हफ्यात परतफेड होणारी सुविधा देण्यात येणार आहे. या आस्थापनेत हिंद कामगार संघटना मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे कराराचा लाभ सर्व कायम कामगारांना होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.