‘फक्त मराठी’चा शूर वीरांना सलाम – ‘सत्यमेव जयते’

एमपीसी न्यूज – असामान्य वीरता, जाज्वल्य अभिमान हे शब्द ही जिथे अपुरे पडतात तिथे सुरू होते भारतातील शूरवीरांची साहसी गाथा… ‘सद्रक्षणाय खलनिग्रहाय’ या शपथेवर पोलिसांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहिलं आहे. त्यांचे त्याग, परिश्रम, जिद्द यांना अभिवादन करीत त्यांच्या वीरतेचे स्मरण करून देण्यासाठी ‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनीने पोलिसांच्या पराक्रमी कथांवर आधारित धमाकेदार मराठी चित्रपटांचा नजराणा ‘सत्यमेव जयते’मध्ये आणला आहे. ‘फक्त मराठी’ वर 18 मार्च ते 24 मार्च या कालावधीत दररोज रात्री 7.30 वा. प्रेक्षकांना हे चित्रपट पहता येणार आहेत.
‘सत्यमेव जयते’मध्ये ‘मेड इन महाराष्ट्र’, ‘खतरनाक’, ‘पोलिसाची बायको’, ‘फौजदार ज्योतिबा सावंत’, ‘जिवा सखा’, ‘सहा सप्टेंबर’ आणि ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ‘फक्त मराठी’ नेहमीच नव्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करीत असते. ‘सत्यमेव जयते’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.