मुलगी झाल्याच्या गोड बातमीनेच निवडणुकीतील यशाची खात्री – कैलास बारणे

एमपीसी न्यूज – तीन फेब्रुवारी… उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस… एकीकडे अर्ज भरण्याची धावपळ सुरु असतानाच फोन आला आणि गोड बातमी समजली ती म्हणजे मुलगी झाल्याची. या बातमीनेच निवडणुकीतील यश निश्चित असल्याची खात्री दिली, अशा भावना कैलास बारणे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या.

एमपीसी न्यूजशी संवाद साधताना कैलास बारणे म्हणाले की, शेती व हॉटेलचा व्यवसाय. चुलते रामचंद्र विठोबा बारणे यांची खूप इच्छा होती की, घरातील कोणीतरी राजकारणात उतरावे. खर तर घरात कोणताही राजकीय पाठिंबा नव्हता. फक्त सामाजिक व धार्मिक कार्याची आवड या जोरावर निवडून आलो. सुरुवातीला 15 वर्ष शिवसेनेचे काम केले. त्यानंतर अलिकडील दोन वर्षात भारतीय जनता पक्षाचे काम केले. पण घरच्यांचा व मित्रमंडळींचा, ज्येष्ठांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे हे यश मिळू शकले.

तसे घरी एकत्रित कुटुंब आहे. घरात हा शेतीचाच व्यवसाय. लहानपणांपासूनच शेतीची आवड. शेती करताकरता थेरगावमध्ये हॉटेल महाराजा सुरु केले. त्यातून जनसंपर्क वाढला. 15 वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे यश मिळण्यावर आत्मविश्वास होता. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस 3 फेब्रुवारीला होता. त्याच दिवशी मुलगी झाली ही गोड बातमी मिळाली अन् मनांत यशाची खात्री वाटली.



प्रभाग क्रमांक 23 मधून गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, थेरगाव गावठाण, साईनाथनगर, समर्थ कॉलनी या प्रभागातून  अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहे. अतिशय शांत स्वभाव असणारे पण कामांत चोखंदळ राहणारे कैलास बारणे हे आपल्या सामाजिक कार्यातून पुढे आले हीच त्यांच्या कामाची पावती म्हणता येईल.

तसेच प्रभागात मूलभूत सुविधा देण्यावर भर, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार, टवाळखोर मुलांना आळा कसा बसेल यासाठी पोलीस चौकीची मागणी करणार, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.