हिंजवडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; चालक गजाआड

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील ट्रकने समोरुन जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.17) मारुंजी येथे घडली. 

प्रमोद विठ्ठल पानसरे (वय 26, रा. डांगे चौक, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या दूचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर, सहप्रवासी विजय तिकोणे हा जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रकचालक तायेर रशीद शेख (वय 27, रा. आदर्श कॉलनी, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रमोद याचा मित्र अजित जाधव (वय 27, रा. जाधववाडी, ता. जुन्नर, पुणे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
 

प्रमोद पानसरे हा मारुंजी येथील एका महाविद्यालयात फॉर्मसी करत होता. तर, त्याचा मित्र विजय हाही त्याच महाविद्यालयात शिकत आहे. शुक्रवारी प्रमोद आणि विजय दुचाकीवरुन हिंजवडी येथून जात होते. शिंदे वस्तीजवळून जात असताना समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने त्याला जोरात धडक दिली. त्यात प्रमोद याचा जागीच मृत्यू झाला. तर, सहप्रवासी विजय हा जखमी झाला आहे.

अपघातानंतर तायेर हा घटनास्थळी न थांबता पळून गेला होता. हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिंजवडी ठाण्याचे फौजदार विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.