शनिवार, डिसेंबर 3, 2022

पिंपरी-चिंचवड महापालिका सभेसाठी नगरसेवकांनाही आता बायोमॅट्रिक हजेरी

एमपीसी न्यूज – पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिका ही घेणार महापालिका सभेत नगरसेवकांनी बायोमॅट्रिक हजेरी  सुरू करण्यात येणार आहे. तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्तांनी नगर सचिव व संगणक विभागाला दिले आहे.

 

महापालिका सभेतील नगरसेवकांच्या उपस्थितीला शिस्त लावण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड महापालिकाही बायोमॅट्रिक हजेरी  सुरू करणार आहे. तसे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आदेश नगरसचिव विभाग व संगणक विभागाला दिले आहेत. पुणे महापालिकेत ही यंत्रणा कार्यरत आहे. त्यानुसार  महापालिका प्रशासन प्रायोगिक तत्वावर यंत्रणा राबविण्याचा विचार करत आहे.

 

नगरसेवकांच्या मनमानी उपस्थितीला यामुळे आळा बसणार असून नगरसेवकांना आता त्यांची उपस्थिती दर्शविणे गरजेचे ठरणार आहे. कारण सलग तीन महिने  महापालिका सभांना अनुपस्थिती असल्यास संबंधित नगरसेवकाचे नगरसेवकपद रद्द होते. त्यामुळे वेळेत हजेरी लावणे आता नगरसेवकांना आळा बसणार आहे. दहा मिनिटांसाठी तहकूब होणा-या सभांनाही आळा बसेल.

मात्र, काही कायदेशीर बाबी व तांत्रिक बाबींचा विचार  करूनच ही यंत्रणा कार्यरत करता येईल, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

Latest news
Related news