शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी चेतन तुपे

एमपीसी न्यूज –  पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक चेतन तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तुपे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

 

यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी गटनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 38 नगरसेवक निवडुन आले आहेत. अन्य दोन जणांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांच्या नगरसेवकांची संख्या 40 झाली आहे. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी तुपे यांची निवड करण्यात आली.

 

चेतन तुपे हे तिस-यांदा नगरसेवक झाले आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात 28 पैकी राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. तुपे यांनी स्वतःच्या प्रभागातील अन्य तीनही जण निवडून आणले आहेत. त्यामुळे तुपे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी हा पालिकेतील प्रमुख विरोधीपक्ष असल्यामुळे तुपे यांची विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

spot_img
Latest news
Related news