पिंपरीचे रांगडे महापौर महापालिकेच्या जुन्या खुर्ची व गाडीत ‘अनकम्फर्टे’बल

महापौरांना हवी नवी गाडी?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापौर नितीन काळजे हे उंची व रांगडे शरीर यामुळे महापालिकेच्या जुन्या खुर्ची व गाडीत अन्कम्फर्टेबल फील करत आहेत. त्यासाठी त्यांनी पदभार स्वीकारताच पहिल्यांदा खुर्ची बदलली आता गाडीही बदलणार असल्याची चर्चा आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळालेल्या ग्रामीण नेतृत्वाने महापालिकेत प्रवेशच बैलगाडीतून केला होता. त्यानंतर त्यांनी मग महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. त्यावेळी खुर्चीची उंची कमी आहे म्हणत महापैरांच्या कार्यालयातील खुर्ची आधी बदलली. त्यांच्याबरोबर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सत्तारुढ पक्षनेत्यांच्या कार्यालातील खुर्ची जुनी झाली आहे म्हणत ती खुर्चीही बदलली.

 

आता खुर्ची बदल नाट्य गाडीपर्यंत येऊन ठेपले असून, गाडी आवाज करते तसेच च-होली गावातील रस्त्यावर गाडी रस्त्यांना खरडते, असे सांगत आता महापौर गाडी बदलणार आहेत. ही गाडी सुमारे पाच वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर मोहिनी लांडे यांच्या काळात घेतली होती.

 

गाडी खुर्ची बरोबरच आता विरोधीपक्षनेते कार्यालय व उपमहापौर कार्यालयही बदलण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.