अध्यात्मिकतेकडून राजकारणात आलेले सुरेश भोईर

एमपीसी न्यूज – सांप्रदायिक व सामाजिक कार्याच्या जोरावर मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुरेश भोईर यांनी आता पालिकेच्या राजकारणातही प्रवेश केला आहे.

 

सुरेश भोईर यांचे  एकत्रित व शेतकरी कुटुंब आहे. चिंचवड येथे मोरया प्रिंटर्स नावाने प्रेसचा व्यवसाय आहे. अध्यात्मिक व सांप्रदायिकतेची जोड मिळाल्यानंतर अनेक धार्मिक व सामाजिक संघटनेशी त्यांची जवळीक निर्माण झाली. लहानपणापासून सांप्रदायिकतेची आवड आहे. आजपर्यंत गेली 34 वर्षांपासून रोज मोरया गोसावी यांचे दर्शन घेऊन पुढील कार्यास सुरुवात करत. हा नियम सातत्याने आजपर्यंत करीत आहे. सुरेश भोईर हे प्रभाग क्रमांक 18 मधून 15905 एवढी मते मिळवून भाजपमधून निवडून आले आहेत.

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी ते दरवर्षी पंढरपूर यात्रेचे आयोजन करतात. शिक्षण घेत असताना मित्रांना वेगवेगळ्या कामात सामाजिक उपक्रम घेण्यास मदत करत होतो. श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा महोत्सव, पिंपरी-चिंचवड ब्लड डोनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना, श्री गजानन सेवा सत्संग सेवा मंडळ, मोरया मित्र मंडळ आदी मंडळांच्या माध्यमांतून जनसंपर्क वाढविण्यास मदत झाली. तसेच दरवर्षी  करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी घेण्यात येतो. लहानपणांपासूनच अध्यात्मांची आवड आहे.

 

महिलांसाठी अद्ययावत जीम, मुलांसाठी विविध उद्याने, सिमेंट रस्ते, महिलांचा महत्वाचा प्रश्न स्वच्छतागृहे आदी प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहे. महापालिकेत आता हक्काच्या पदाने काम करणार याचाच खूप आनंद होतोय.  माझ्यावर जो मतदारांनी विश्वास ठेवून मला मताधिक्य मिळवून दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील अशी आनंददायक भावना त्यांनी एमपीसी न्यूजकडे बोलून दाखविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.