वाकड येथील तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज – आठ दिवसांपूर्वी घरी कोणालाही काहीही न सांगता बाहेर गेलेला तरुण अद्यापर्यंत घरी परतला नाही. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 
 

महादेव बाबुराव कांबळे (वय 28, रा. भूमकर वस्ती, वाकड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सदाशिव बाबुराव कांबळे याने फिर्याद दिली आहे.

महादेव हा मानसिक रुग्ण असून आपल्या कुटुंबीयासमवेत तो वाकड येथे राहतो. 12 मार्चला  सायंकाळी चारच्या सुमारास घरी कोणालाही काहीही न सांगता तो अचानक गायब झाला. 

आठ दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. त्याची उंची पाच फूट पाच इंच, निम गोरा वर्ण, अंगाने मजबूत डोळे आणि केसही काळे पांढरे, नाक सरळ, बारीक मिशी, चेहरा उभट, खुरटी दाढी, अंगात लाल शर्ट आणि  निळ्या रंगाची जीन्स परिधान केला आहे.  पायात सॅन्डल घातला आहे, अशा वर्णनाचा  तरुण कोठे आढळल्यास वाकड पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.