डिपेक्स प्रदर्शनात स्व. संदीप शेवडे कलादालनाचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरीतील एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेच्यावतीने डी. वाय, पाटील विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने २८ वे राज्यस्तरीय डिपेक्स प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनातील स्व. संदीप शेवडे कलादालनाचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले.

प्रदर्शनास व कलादालनास विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील कलादालनास अभाविपचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. संदीप शेवडे असे नामकरण करण्यात आले. याचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्व. संदीप शेवडे यांचे वडील व माजी नगरसेवक वसंत शेवडे आदी उपस्थित होते.

या कलादालनात नारी सन्मान, थिंक इंडिया, वसुधैव कुटुंबकम, शिक्षण, विद्यार्थी कार्यप्रणाली, राष्ट्रसन्मान आदींचा वापर करुन चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे.  तसेच डिपेक्सची माहिती, अभाविची कामे आदी प्रकार चित्रांद्वारे मांडण्यात आला आहे.

हे कलादालन उद्यापर्यंत (सोमवार)  विनामूल्य सकाळी दहा वाजल्यापासून खुले आहे.

हजारोंच्या संख्येने विविध महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी या ठिकाणी भेट देत आहेत. डिपेक्समध्ये 270 अभियांत्रिकी प्रकल्प आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प यामध्ये पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. प्रदर्शनाचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस आहे.

"dipex

"dipexf"

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.