मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गजाआड

पाच गुन्ह्यातील पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. चिंचवड, भोसरी आणि देहुरोड येथून या दुचाकी चोरल्या आहेत. ही कारवाई वाकड येथील कस्पटे वस्तीत करण्यात आली.


दिपक बबन ठाकुर (वय-19, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

वाकडमधील वाहन चोरीच्या घटनांचा तपास करत असताना तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढऱे हे गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड यांना एक वाहन चोर कस्पटे वस्ती येथील छत्रपती चौकात अॅक्टीव्हा मोपेड दुचाकीसह थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दिपक ठाकुरला ताब्यात घेऊन दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली. चौकशी दरम्यान समाधानकारक माहीती मिळाली नसल्याने त्याला वाकड पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरी असल्याचे सांगितले.  त्याने पुणे शहर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून अॅक्टीव्हा, पल्सर, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरलेली स्पेंडर, भोसरी येथून डि.ओ. मोपेड, देहुरोड येथून स्पेंडर अशा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. मौजमजा करण्यासाठी ही वाहने चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.


ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, पोलीस कर्मचारी अशोक दुधवे, बापु धुमाळ, गणेश हजारे, सागर सुर्यवंशी, शाम बाबा, हेमत हांगे, मोहिनी थोपटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.