स्थापना दिनानिमित्त एफटीआयआयमध्ये गाजलेले लघुपट पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज – भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) 57 व्या स्थापना दिनानिमित्त नागरिकांसाठी आज (सोमवारी) लघुपट पाहण्याची संधी देण्यात आली आहे.

या कार्यकक्रमात संस्थेच्या प्रमुख चित्रपटगृहात सकाळी 11.30 ते 1 या वेळात हे लघुपट दाखवले जाणार आहेत.  तसेच  संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बनवलेले आणि त्या त्या वेळी पारितोषिकांनी नावाजले गेलेले हे लघुपट पाहण्याची संधी या कार्यक्रमातून नागरिकांना मिळणार आहे.

यामध्ये क्रांती कानडे यांनी बनवलेला ‘चैत्र’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘गिरणी’, अरुण सुकुमार यांचा ‘व्हेन धीस मॅन डाइज’, कौशल ओझा यांचा ‘आफ्टरगो’, आंद्रे लॅनेटा यांचा ‘अल्ला इज ग्रेट’ आणि तुषार मोरे दिग्दर्शित ‘सदाबहार ब्रास बँड’ या लघुचित्रपटांचा समावेश आहे.

या कार्यक्रमापूर्वी सकाळी साडेदहा वाजता संस्थेचा इतिहास उलगडणाऱ्या छायाचित्रांचे ‘डाऊन मेमरी लेन’ हे प्रदर्शनही भरवले जाणार आहे. वाळूचा वापर करून कला साकारणारे सुदर्शन पटनाईक हे ओडिशाचे कलाकार प्रदर्शनाचे उद्‌घाटन करणार असून, पटनाईक यांच्या कलाकृतीही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. 

संस्थेच्या 57 वा स्थापना दिनानिमित्त संस्थेचे आवार व प्रसिद्ध ‘व्हिज्डम ट्री’चा परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने सजवण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी संस्था नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती.

 

"ftii0"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.