भवानी पेठेत डॉक्टर नसल्याचे सांगितल्याने वॉर्डबॉयला मारहाण; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – भवानी पेठेतील गुळ आळी येथे दवाखान्यामध्ये डॉक्टर नाहीत असे सांगणा-या वॉर्डबॉयला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली.

तुषार रवींद्र चंगल (वय-25), अभिषेक अशोक चंगळ (वय – 25), अतुल मंगेश जळगावकर (वय-28) आणि तौसिफ शकुर शेख (वय-45) सर्व रा. भवानी पेठ, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वॉर्डबॉय सिद्धेश्वर शिंदे (वय-34,रा. भवानी पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नमुद इसम हे गितांजली कॉम्प्लेक्स येथील दवाखान्यात उपचारासाठी गेले होते. परंतू वॉर्डबॉय शिंदे यांनी डॉक्टर नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने संबंधित इसमांनी फिर्यादींना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि सीसीटव्ही कॅमेरे फोडून दवाखाना पेटवून देण्याची धमकी दिली.

पालीस उप निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.