जैन सोशल ग्रुप डायमंडच्या अध्यक्षपदी अनुप शहा

एमपीसी न्यूज – सामाजिक बांधिलकी जपणा-या जैन सोशल ग्रुप डायमंडच्या पिंपरी-चिंचवड  अध्यक्षपदी अनुप शहा यांची निवड करण्यात आली. जैन सोशल ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालचंद जैन यांच्या उपस्थितीत शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली.  

हॉटेल कलासागरमध्ये रविवारी (दि. 19) झालेल्या कार्यक्रमाला जैन सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि पुना रिजनचे सचिव दीपक डागा, राष्ट्रीय अध्यक्ष सतीश बाफना, गो ग्रास कमिटीचे अध्यक्ष सौरभ शहा, मावळते अध्यक्ष सुनील गांधी, उपाध्यक्ष जगदीश शहा, माजी अध्यक्ष नयन भंडारी, नरेश शहा, कामेश शहा, माजी खजिनदार देवेंद्र बोरा, अतुल धोका आदी उपस्थित होते.  

जैन सोशल ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष लालचंद जैन यांच्या उपस्थितीत शहा यांच्यासोबत उपाध्यक्ष सुनील शहा, सचिव पंकज गुगळे, खजिनदार प्रशांत गांधी आणि सहसचिव अनिल धोका यांनीही पदभार स्विकारला. 

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अनुप शहा म्हणाले, वर्षभराच्या कालावधीमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे. जैन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहेत.  

सामाजिक बंधुता आणि मनोरंजन या हेतूने जैन सोशल ग्रुपची पिंपरी-चिंचवड शहरात स्थापना झाली. ग्रुपच्या वतीने गोरगरिब मुलांसाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन देखील केले जाते.  वृद्धाश्रमातील नागरिकांना मदत करण्यात येते. रक्तदान असे विविध सामाजिक उपक्रम वर्षभरामध्ये राबविले जातात. 

ग्रुपमधील सभासदांसाठी महिन्यातून एक कार्यक्रम घेण्यात येत असतो. धार्मिक, मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक, आरोग्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग असे विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात.  ग्रुपमधील सभासदांसाठी ती एक निखळ आनंद आणि बांधिलकीची पर्वणी ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कासवा आणि मनीषा जैन यांनी केले. तर, पंकज गुगळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.