सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

कराटे पटू तनिष्का कोंडे हिचा विशेष सन्मान

एमपीसी न्यूज – वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून कराटे खेळण्यास सुरुवात केलेल्या कात्रज येथील तनिष्का कोंडे हिने श्रीलंका, नेपाळसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे नाव उंचावणा-या तनिष्काचा कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. 

दत्तमंदिर ट्रस्टचे अ‍ॅड.एन.डी.पाटील, बी.एम.गायकवाड, चंद्रशेखर हलवाई, युवराज गाडवे, अ‍ॅड. शिरीष शिंदे आदी उपस्थित होते. तनिष्का कोंडेसह पत्रकार कल्पना खरे यांचा रायफल शुटींग स्पर्धेतील यशाबद्दल सन्मान करण्यात आला. महावस्त्र, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.

अ‍ॅड.एन.डी.पाटील म्हणाले की, इतक्या लहान वयात तनिष्काने मिळविलेल्या यशामुळे पुण्याचे नाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचत आहे. पुणे महापौर चषक, मुंबई महापौर चषक अशा स्पर्धांसह दिव-दमण येथील स्पर्धांमध्ये मिळून तनिष्काने 22 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकांसह अनेक पारितोषिके मिळविली आहेत. त्यामुळे तनिष्कासारख्या बाल क्रीडापटूंना प्रोत्साहित करण्याकरीता ट्रस्टतर्फे हा सन्मान करण्यात आला आहे.

spot_img
Latest news
Related news