भारती विद्यापीठात एमडी करणा-या विद्यार्थीनीची वसतीगृहात आत्महत्या

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठातील आयुर्वेद महाविद्यालयात एमडी करणा-या एका 26 वर्षीय तरुणीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (सोमवारी) सकाळी उघडकीस आला.

प्रियंका देविदास भालेराव (वय 26, सध्या रा. पीजी गर्लस्स हॉस्टेल, भारती विद्यापीठ, पुणे, मूळ परभणी), असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.

प्रियांका भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय  महाविद्यालयात एमडीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. पीजी मुलींच्या वसतीगृहाच्या 407 क्रमांकाच्या खोलीमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत राहायला होती. रविवारी रात्री तिच्या रूमपार्टनरची नाईट शिफ्ट होती. त्यामुळे प्रियंका रूममध्ये एकटीच होती. मैत्रीण सकाळी आठच्या सुमारास रूमवर आली. तिने दार ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे तेथील खिडकीतून तिने रूममध्ये डोकावून पाहिले असता तिला प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसले.

तिने त्वरीत सुरक्षारक्षकाला याची माहिती दिली. काही वेळाने पोलिसांनी तेथे येऊन त्यांनी दार उघडले. त्यांनी खोलीची तपासणी केली असता, त्यांना चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.