बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त डोळसनाथ पतसंस्थेने घेतले विद्यार्थ्यांचे पालकत्व

एमपीसी न्यूज – बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त डोळसनाथ पतसंस्थेच्या वतीने नाणे येथील नाणे माध्य. विद्यालयामधील 5 विद्यार्थ्यांचे 1 वर्षासाठीचे पालकत्व स्वीकारण्यात आले.

बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृष्णराव भेगडे, माऊलीभाऊ दाभाडे, बापूसाहेब भेगडे, अर्चना घारे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सुरेश चौधरी, नाना कारके, सुरेश धोत्रे, गणेश काकडे, अशोक भेगडे, मंगला भेगडे नगरसेविका, वैशाली  दाभाडे , शबनम खान,  अंकुश आंबेकर,  जिल्हा परिषद सदस्य बाबुराव  वायकर, शोभा कदम, रंजना भेगडे, सुनील दाभाडे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, चंद्रकांत दहिभाते,  नारायण ठाकर, शांताराम लष्करी, नामदेव शेलार, संतोष जांभुळकर, रामराव जगदाळे  राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघ, नगरसेवक विशाल दाभाडे, अरूण माने,  कैलास गायकवाड, प्रकाश आगळमे, नारायण गायकवाड, सुदर्शन खांडगे, संतोषशेठ खांडगे, नंदकुमार कोतुळकर आदी उपस्थित होते.

यावेळी नाणेतील वैष्णवी ज्ञानेश्वर आंदे (8 वी), अश्विनी लक्ष्मण पारधी (ठाकरवाडी, 9 वी), अक्षय सोमनाथ वाघुले (नाणोली 9 वी), दीपक बबन पिंगळे (9 वी) आणि आरमान मोईन शेख (9 वी) असे पालकत्व घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.  तसेच यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वप्निल नागणेही उपस्थित होते.

यावेळी पुणेरी पगडी देऊन बबनराव भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश आंबेकर यांनी केले. नारायण ठाकर, रामराव जगदाळे, राहुल पारगे, अशोक घारे, माऊलीभाऊ दाभाडे, कृष्णराव भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बबनराव भेगडे म्हणाले,  मी शिस्तीने काम करतो याचे गमक म्हणजे भेगडे साहेबांमुळेच. जो चांगला काम करतो त्याला योग्य न्याय द्यायचे काम भेगडे साहेबांनी शरदराव पवार साहेबांच्या माध्यमातून अत्यंत हातोटीने केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पिढी घडली  व आम्हाला बहुमोल पाठीशी उभे राहून मार्गदर्शन केले. या ऋणातून उतराई होण्याचा कसोशीने प्रयत्न राहील.

सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.