शनिवार, ऑगस्ट 20, 2022

राहूल सचदेव, केतन चावला यांच्यात विजेतेपदासाठी लढत !


दुसरी पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा !!

स्पर्धेतील पुण्याचे आव्हान संपुष्टात !

एमपीसी न्यूज – पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे आयोजित दुसर्‍या ‘राजाभाऊ शहाडे करंडक’ पीवायसी-ग्रीन बेझ खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या राहूल सचदेव आणि केतन चावला या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. निमिश कुलकर्णी याच्या पराभवामुळे पुण्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित राहूल सचदेव याने पीवायसीच्या निमिश कुलकर्णी याचा 66-25, 82-12, 59-38 असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्यपुर्व फेरीत राहूल याने पीवायसीच्या विशाल कदम याचा 64-49, 67-18, 61-42 असा पराभव केला.

मुंबईच्या व तिसर्‍या मानांकित केतन चावला याने आंध्रप्रदेशच्या व दुसर्‍या मानांकित हिमांशू जैन याचा 78-17, 33-68, 39-59, 62-49, 61-35 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. केतन याने उपांत्यपुर्व फेरीत नाशिकच्या अभिजीत रानडे याचा 74-36, 57-32, 65-39 असा पराभव केला.

याआधी झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यांमध्ये पीवायसीच्या निमिश कुलकर्णी याने मुंबईच्या मुकूंद भराडीया याचा 64-42, 73-49, 56-32 असा पराभव केला. हिमांशु जैन याने भरत सिसोडीया याचा 65-18, 66-35, 78-68 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती.

स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः उपांत्यपुर्व फेरीः

निमिश कुलकर्णी (पीवायसी) वि.वि. मुकूंद भराडीया (मुंबई) 64-42, 73-49, 56-32;

केतन चावला (मुंबई) वि.वि. अभिजीत रानडे (नाशिक) 74-36, 57-32, 65-39;

राहूल सचदेव (मुंबई) वि.वि. विशाल कदम (पीवायसी) 64-49, 67-18, 61-42;

हिमांशु जैन (आंध्रप्रदेश) वि.वि. भरत सिसोडीया (मध्यप्रदेश) 65-18, 66-35, 78-68;

उपांत्य फेरीः राहूल सचदेव (मुंबई) वि.वि. निमिश कुलकर्णी (पीवायसी) 66-25, 82-12, 59-38;

केतन चावला (मुंबई) वि.वि. हिमांशू जैन (आंध्रप्रदेश) 78-17, 33-68, 39-59, 62-49, 61-35;

spot_img
Latest news
Related news