भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून महाराष्ट्राचे नामदेव शिरगांवकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती


मध्यप्रदेश ऑलिंपिक असोसिएशन निवडणूक

एमपीसी न्यूज – भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेल्या नामदेव शिरगांवकर यांची मध्यप्रदेश ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिरगांवकर हे भारतीय ऑलिंपिक संघटेनेचे सक्रिय सदस्य असून, ते ‘मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया’ या संघटनेचे सरचिटणीस आहेत. मध्यप्रदेश ऑलिंपिक संघटेनेच्या निवडणुकीवर ते लक्ष ठेवतील आणि निरीक्षक म्हणून काम पाहतील. यासंदर्भातील नियुक्तीचे पत्र भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी नुकतेच प्रसिद्धीस दिले आहे.

ही निवडणूक बुधवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जबलपूरमधील महानअड्डा भागातील हॉटेल गुलझार येथे पार पडणार आहे.मध्यप्रदेश ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव दिग्विजयसिंग यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिरगांवकर यांना प्रदान करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.