सात कोटींच्या वर्गीकरण प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी


एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेमध्ये आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सुमारे सात कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याबाबतचे 20 ठरावांना मंगळवारी मंजूरी देण्यात आले. मात्र यापूर्वी स्थयी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी अर्थसंकल्पाची मोडतोड करणार नसल्याचे सांगत, एकही ठराव मंजूर केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे हे वर्गीकरणाचे ठराव कोणच्या दाबावा खाली मंजूर करण्यात आले या बाबत पालिका वर्तुळात चर्चा लागली आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील योजनांच्या अमंलबजावणीवर भर असल्याने वर्गीकरणे मंजूर करणार नसल्याची भूमिका स्थायी समिती अध्यक्षांनी घेतली होती. महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या (2017-18) मंजुरीनंतर काही दिवसांतच प्रभागांमधील कामांकरिता वर्गीकरणाद्वारे निधी देण्याबाबतचे ठराव स्थायी समितीकडे आले होते. मात्र, एवढ्या लवकर त्याला मंजूर देणार नसल्याची भूमिका अध्यक्षांनी घेतली. सर्वपक्षीय सदस्यांचे ठराव आल्यानंतरही स्थायी समितीने आपली भूमिका कायम ठेवली होती.

वर्गीकरणे मंजूर व्हावीत, याकरिता त्या त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दबावतंत्राचाही वापर केला होता. परंतु, अर्थसंकल्पाची मोडतोड करणार नसल्याचे सांगत, एकही ठराव मंजूर केला जाणार नाही, या भूमिकेया मोहोळ ठाम राहिले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यात आलेले जवळपास 20 ठराव मंगळवारच्या बैठकीत मंजूर करण्यात आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी कोणच्या दबावाखाली आपली भूमिका बदली याबाबत चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<