लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या निसर्ग हॉटेलात चोरी

44 हजारांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज – लोहगड किल्ल्यांच्या पायथ्यालगत असलेल्या लोहगड निसर्ग या घरगुती हाँटेल मध्ये शनिवारी (दि.22) रात्री नऊ ते रविवारी (दि.23) दुपारी बारा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करत 44 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी हाँटेल मालक सोमनाथ तुकाराम भालेराव यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भालेराव हे बाहेर गावी असताना अज्ञात चोरट्यांनी लोहगड  निसर्ग या घरगुती हाँटेलचे खिडकीचे लोखंडी ग्रिल जाळी टिकावाने उचकटून त्या मधून हाँटेलात प्रवेश करत किर्लोस्कर कंपनीचा पंप, शासनाच्या विशेष योजनेतून मिळालेली शेतीची अवजारे, पाँलिकाँबच्या वायरचे बंडल, ड्रिल मशिन, संसार उपयोगी वस्तु, हाँटेलमधील  साहित्य व किराणा माल व सात हजार रुपये रोख असा सुमारे 44 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेहले आहेत.  तसेच हाँटेलमध्ये विष्टा करुन घाण केली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवी कलम 454, 457, 380, 427 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी.जे.जगताप हे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.