मतदार नोंदणीच्या कामाला अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांवर कारवाई करा


उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या तरुण व पात्र मतदार नोंदणी मोहिम अभियानाला अनुपस्थित राहिलेल्या लोणावळा नगरपरिषद शिक्षण विभागाच्या बी.एल.ओ. म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणूक आयोगाच्या वतीने तरुण व पात्र उमेदवारांची नावनोंदणी करण्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहिम राबवली होती.याकरिता लोणावळा नगरपरिषद शिक्षण विभागातील 14 शिक्षकांची बी.एल.ओ.म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.अभियान यशस्वी करण्य‍ाची जबाबदारी संबंधित शिक्षकांवर देण्यात आली होती. या शिक्षकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून तरुण व पात्र मतदारांचे अर्ज स्विकारणे अभिप्रेत असताना त्यांनी एकही अर्ज स्विकारला नाही व तो लोणावळा मंडल अधिकारी यांच्याकडे सादर केला नाही.यामुळे लोणावळ्यातील तरुण व पात्र मतदार नावनोंदणी पासून वंचित राहिले आहे. ही बाब अत्यंत गंभिर असल्याने कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत सदर मोहिमेस अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी पुजारी यांनी केली आहे.

पुजारी म्हणाले शिक्षकांनी कामे न केल्याने अनेक मतदार हे नोंदणीपासून वंचित राहिले आहे.याकरिता निवडणूक आयोगाने ही मोहिमेला पुन्हा मुदतवाढ देऊन अभियान सुरु ठेवावे.

      

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.