चाकण रोटरी एअरपोर्टच्या अध्यक्षपदी सुधीर वाघ


एमपीसी न्यूज – चाकण रोटरी क्लब ऑफ एअरपोर्टच्या अध्यक्षपदी सुधीर वाघ यांची तर सचिवपदी विकास वाव्हळ यांची निवड करण्यात आली.

चाकण रोटरी क्लब ऑफ एअरपोर्टच्या वतीने रोटरी एअरपोर्टच्या नूतन अध्यक्ष, सचिव व संचालकांचा अधिकार स्वीकार समारंभ चाकण येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रोटरी एअरपोर्टच्या सन 2017-18 या वर्षाकरिता वाघ यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी वाव्हळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, रोटरीच्या डायरेक्टर विन्स कमिटीच्या रश्मी कुलकर्णी चाकण रोटरीचे ज्ञानेश्वर सातव, यांचे हस्ते सुधीर वाघ यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, रोटरीचे पदाधिकारी अतुल वाव्हळ, बाळासाहेब वायकर, संजय वाडेकर, प्रशांत अभंग प्रकाश मुटके, दतात्रेय बुट्टे, तुकाराम कांडगे, संतोष वाव्हळ आदी उपस्थित होते.

चाकण ग्रामपंचायतीचे 15 वर्षे सदस्य राहिलेले सुधीर वाघ यांनी चाकण रोटरी एअरपोर्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चाकण पंचक्रोशीतील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष वाघ यांनी यावेळी सांगितले की सर्वांनी एकत्रित येण्याचे माध्यम म्हणजे रोटरी असून, रोटरीच्या माध्यमातून या वर्षी संगणक संच, रक्तदान शिबिर, रुबेला लसीकरण, वृक्षारोपण, चाकण शहराच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच समाजाभिमुख उपक्रमावर भर देण्यात येणार आहे.

तुकाराम कांडगे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, चाकण परिसरातील 26 महिलांचा रोटरी एअरपोर्टमध्ये यावेळी समावेश करून घेण्यात आला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.