चाकण येथे मामाचा अकरा वर्षीय अल्पवयीन भाचीवर बलात्कार

चाकणच्या खंडोबा माळ येथील प्रकार

एमपीसी न्यूज- नातेसंबंधाचा गैरफायदा घेऊन चाकण ( ता. खेड ) येथील खंडोबामाळावर २३ वर्षीय मामाने घरात कोणी नसताना इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबधित मामावर शुक्रवारी ( दि. २८) चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

संबधित पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबामाळ येथे संबधित अल्पवयीन पिडीत मुलगी कुटुंबीयांसह राहण्यास असून चाकण मध्ये शिक्षण घेत आहे. घरात कोणी नसताना मामाने नातेसंबंधांचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन भाचीवर बळजबरीने पाशवी बलात्कार केला. भेदरलेल्या मुलीने काही दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
नंतर सतत या बाबत भीती वाटू लागल्याने हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या घरच्यांना मामा कृष्णा खूप त्रास देत असल्याचे सांगितले. घरच्यांनी त्याच्याकडे अधिक खोलवर चौकशी केली असता मामाने बळजबरीने अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संबंधित मामाच्या विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यांच्या फिर्यादिवरून याच्याविरोधात भा.द.वि.कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले असून चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.