आजारपणाला कंटाळून महिलेची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या


एमपीसी न्यूज- कोथरूडमध्ये डी. पी. रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या ऋतुरंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. तिने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. 

ज्योत्स्ना विठ्ठल ब्राह्मणकर (वय 52), असे या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत महिला मागील काही वर्षांपासून आजारी होती. तिला डायबिटीस आणि मणक्याच्या आजाराचा त्रास होता. ऋतुरंग सोसायटीतील फ्लॅटमध्ये ब्राह्मणकर पती-पत्नी दोघेच राहत होते. त्यांना दोन मुली असून दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. तर पती विठ्ठल ब्राह्मणकर हे मुंबईत एसबीआयमध्ये नोकरीस आहेत. ज्योत्स्ना यांना आजार असल्यामुळे रोज औषधे घ्यावी लागत असे. या सर्व प्रकाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.