वडगाव मावळ येथे गरजूंना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वाटप


एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वडगाव मावळ येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या नागरिकांना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, लोकांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून नागरिकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जे नागरिक या मदतीसाठी पात्र आहेत, अशांना मदत करण्यात येत आहे. वडगाव मावळ येथे पीठ गिरणी व शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमात वडगाव मावळचे बाळासाहेब म्हाळसकर, विशाल वाहिले, गणेश ढोरे, विठ्ठल मोहिते आदी उपस्थित होते. 

आर्थिक बाबतीत समाज सक्षम होण्यासाठी यांसारख्या अनेक योजना आहेत. नागरिकांनी त्या योजनांपर्यंत पोहोचायला हवे. योग्य योजनांची माहिती घेऊन त्याबाबत पाठपुरावा केल्यास शासन नक्की मदत करते. मावळ परिसरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या योजनेचा पाठपुरावा करून लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव वायकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.