सेनापती बापट रस्त्यावर भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकून उलटली

चालक किरकोळ जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील वर्दळीच्या सेनापती बापट रस्त्यावर आज (31 जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव वेगातील कारच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ती कार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये चालक अमोल जोशी (वय-58) किरकोळ जखमी झाला असून कारचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जोशी आणि त्यांचा मित्र टाटा जिस्ट कारने सेनापती बापट रस्त्यावरून नळ स्टॉपच्या दिेशेने येत असताना हा अपघात झाला. सिम्बायोसीस महाविद्यालयाच्या पुढे आल्यानंतर चालक अमोल जोशी यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती सरळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरात की, कार रस्त्याच्या मधोमध उलटी झाली. जवळपास असणा-या नागरिकांनी लगेच धाव घेत जोशी आणि त्यांच्या सहका-याला गाडीबाहेर काढले. या अपघातात जोशी यांना किरकोळ जखम झाली असून त्यांचे सहकारी सुरक्षित आहेत.

दरम्यान, कार रस्त्याच्यामध्ये उलटली असल्याने सेनापती बापट रस्त्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तेथील नागरिकांनी लगेच कार रस्त्याच्या बाजूला नेत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आणि जखमी असलेल्या जोशींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.