बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

तळेगावमध्ये रविवारी रंगणार ‘शिवजयंती उत्सव 2017’

तळेगावातील 25 शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे नगर परिषद, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती यांच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

रविवारी (दि. 19) दुपारी 3.00 वाजता तळेगाव दाभाडे नगर परिषद येथून शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्ररथासह आणि तळेगावमधील ठोल लेझीम पथकासह ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच यामध्ये तळेगावातील 25 शाळांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे. याची सांगता थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्र.1 येथे करण्यात येईल. 

या मिरवणुकीनंतर सायंकाळी 6.00 वाजता विनय दाभाडे यांच्या ‘सरसेनापती’ या महानाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये शिवजन्म ते मराठ्यांचा ज्वलंत इतिहास अनुभवण्याची संधी तळेगाव रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.  या महानाट्यासाठी दुमजली 100 फूटी रंगमंच, आणि 500 कलाकारांचा ताफा सज्ज करण्यात आला आहे.
spot_img
Latest news
Related news