फेडरेशन प्रीमिअर लीग 2017 क्रिकेट स्पर्धेला 28 फेब्रुवारीपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित केलेली फेडरेशन प्रीमिअर लीग 2017 क्रिकेट  स्पर्धा 28  फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे.


स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून मुख्य प्रायोजक पॉलिकॅब आणि सहप्रायोजक  व्हिटीपी ग्रुप, फाल्कोफीक्स आणि सॉलीटेअर आहेत, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.
स्पर्धेचे उद्‌घाटन 28 फेब्रुवारी  रोजी होणार आहे. तर समारोप दिनांंक 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी सौरभ राव, पॉलिकॅब वायर्सचे नितीन बेले, व्हिटीपी ग्रुपचे चेअरमन विलास पालरेशा, सॉलिटेअरचे संचालक अतुल चोरडिया, पीडीलाईट इंडस्ट्रीजचे सुरज शर्मा, भरत भोमावत  यांच्या उपस्थितीत होणार आहे.

स्पर्धेत21  संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये सॉलीटेअर इलेव्हन (पुणे सराफ असोसिएशन), स्टोन स्ट्रायकर्स (मार्बल अ‍ॅन्ड टाईल्स असोसिएशन), पिआ पॉवर (पूना इलेक्ट्रीक अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स् असोसिएशन),  मेटल चॅलेंजर्स  (दि ब्रास अ‍ॅन्ड कॉपर मर्चंट असोसिएशन), नॉन फेरस इलेव्हन (दि इंडस्ट्रीयल नॉन फेरस मेटल मर्चंट असोसिएशन), पीटीएसडीए रॉयल्स (पुणे टाइल्स अ‍ॅन्ड सॅनिटरीवेअर डिलर्स असोसिएशन), अटायर स्मॅशर्स ( पुणे जिल्हा होजिअरी, रेडीमेड, हॅन्डलूम डिलर्स असोसिएशन), लक्ष्मीरोड रॉयल्स (रिटेल टेक्स्टाइल गारमेंटस् सिंडीकेट), ओनेक्स स्ट्रायकर्स (पुणे हार्डवेअर होलसेल डिलर असोसिएशन), मेपलप्लाय मास्टर्स (दि पूना प्लायवूड डिलर्स असोसिएशन), मशिनरी मास्टर्स (पुणे मशिनरी मर्चंटस् असोसिएशन), पुष्पक इन्फ्राकॉन इलेव्हन ((दि पुणे आयर्न अ‍ॅन्ड स्टील मर्चंटस् असोसिएशन), टिम युनीबीक  (मॉडर्न ट्रेड डिस्ट्रीब्युशन), पीसीपीडीए वन (दि पुणे कन्ज्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन),  एमपीएमए इलेव्हन (महाराष्ट्र प्लास्टीक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), स्टेनलेस स्टील आयकॉन (पुणे स्टेनलेस स्टील मर्चंंट असोसिशन), पीसीडब्ल्यूडिए (पुणे कार्पेट अ‍ॅन्ड वॉलपेपर डिलर्स असोसिशन), टिंबर इलेव्हन (दि पुणे टिंबर मर्चंटस् अ‍ॅन्ड सॉ मिल असोसिएशन), पाडा वॉरियर्स (पूना आॅटोमोबाईल डिलर्स असोसिएशन), सीएमडीए आयटी रॉयल्स कम्प्युटर अ‍ॅन्ड मीडिया डिलर्स असोसिएशन), पीसीएमए युनायटेड (पूना कॅम्प मर्चंटस् असोसिएशन) आदी संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे समन्वयक अभय वोरा म्हणाले की, स्पर्धेत एकूण 49 डे – नाईट सामने होणार आहेत. स्पर्धा साखळी आणि बाद या स्वरूपात होईल. साखळी आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने 10 षटकांचे, तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना 12 षटकांचा होणार आहे. विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी तसेच वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूस एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे आयोजन  ब्रिजेन शाह, मनोज सारडा, बक्षीसिंग तलवार, निर्मल शाह, चंदन मुंदडा,  निशिथ संघवी, संजय खोपडे, नितीन पंडित, दिपक शाह, प्रकाश शहा, विजय ओसवाल, मिठालाल जैन, उमेश झंवर, सुभाष पोरवाल,  निलेश सोनिग्रा, कुमार पोरवाल, विजय राठोड, सुनील मेहता, प्रमोद शहा, अरविंद कोठारी यांनी केले आहे.                         

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.