SSC Exam Form : 2022 दहावीच्या परिक्षेसाठी गुरूवारपासून अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2022 मध्ये घेतल्या जाणा-या दहावीच्या परिक्षेसाठी उद्यापासून (गुरूवार, दि.18) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. शिक्षण मंडळाकडून याबाबत प्रकटन जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी बसणा-या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआय प्रशिक्षण संस्थेद्वारे येणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. गुरूवार (दि.18, नोव्हेंबर) ते 09 डिसेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तसेच, 20 ते 28 डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.